November 8, 2025 8:06 PM November 8, 2025 8:06 PM

views 23

न्यूझीलंडबरोबर मुक्त व्यापार करारासंदर्भातल्या चर्चेची चौथी फेरी पूर्ण

न्यूझीलंडबरोबर मुक्त व्यापार करारासंदर्भातल्या चर्चेची चौथी फेरी आज पूर्ण झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅक क्ले यांनी या वाटाघाटींबद्दल समाधान व्यक्त केलं. या करारामुळे उभयपक्षी व्यापार, गुंतवणूक, पुरवठा साखळी आणि बाजारपेठेची उपलब्धता यांना चालना मिळेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. या करारामुळे कृषी, अन्नप्रक्रिया, नवीकरणीय ऊर्जा, शिक्षण, औषध निर्मिती आणि सेवा क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील. या कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरुप देण्याबाबत ...

May 30, 2025 12:45 PM May 30, 2025 12:45 PM

views 16

भारत आणि न्यूझीलंड संबंधांचा विविध क्षेत्रात विस्तार – मंत्री डॉ. एस. जयशंकर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील संबंध विविध क्षेत्रात विस्तारत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री विन्स्टन पीटर्स यांच्याशी काल नवी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर जयशंकर यांनी हे विधान केलं. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांनी नुकतीच भारताला भेट दिली, त्यामध्ये उभय देशांमध्ये मुक्त व्यापार करारासंबंधीच्या वाटाघाटींना सुरुवात झाली तसंच विविध करार करण्यात आले, त्यामुळं त्यांची ही भेट यशस्वी ठरली होती असंही जयशंकर ...

August 8, 2024 8:18 PM August 8, 2024 8:18 PM

views 9

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आज सकाळी वेलिंग्टन इथं पोहोचल्या. न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो यांच्या उपस्थितीत त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी वेलिंग्टन रेल्वे स्थानका समोरच्या उद्यानातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.   राष्ट्रपती मुर्मू यांनी आज वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन आणि इतर नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सीमाशु...