August 5, 2024 7:39 PM August 5, 2024 7:39 PM
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या तीन देशांच्या दौऱ्यावर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या आज फिजी मध्ये नाडी इथं पोहचल्या आहेत. त्या बुधवार पर्यंत फिजीमध्ये असतील. फिजीचे उपप्रधानमंत्री विलियम गावोका आणि फिजीमधले भारताचे उच्चायुक्त पी एस. कार्तिकेयन यांनी राष्ट्रपतींचं स्वागत केलं. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजीचे राष्ट्राध्यक्ष काटोनिवेरे आणि प्रधानमंत्री सिटिव्हनी राबुका यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. त्या फिजीच्या संसदेला संबोधित करणार असून न...