December 30, 2025 7:39 PM December 30, 2025 7:39 PM

views 1

New Year साठी पहाटे ५ पर्यंत पार्टीची परवानगी!

नववर्षानिमित्त उद्या राज्यातल्या खाद्यागृह, हॉटेल, रेस्टॉरंट आणि ऑर्केस्ट्रा बार या आस्थापनांना दुसऱ्या दिवशी पहाटे पाचपर्यंत आपल्या आस्थापना खुल्या ठेवता येतील. दरवर्षी या आस्थापनांकडून येणारी मागणी आणि शासनाकडून मंजूरी यात दरवर्षी होणारा कालापव्यय लक्षात घेता ही परवानगी दरवर्षी डिसेंबरच्या २४, २५ आणि ३१ या तारखांना देण्यात आल्याचं राज्यशासनानं या पत्रकात स्पष्ट केलं आहे.