January 1, 2026 3:36 PM
27
राज्यभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत
नववर्षाचं स्वागत देशभरासह राज्यात आनंदात आणि उत्साहात झालं. राजधानी दिल्लीसह देशाच्या इतर भागातही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक एकत्र आले होते. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं. नव्या वर्षाच्या पहाटे आज मुंबईत पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला. राज्यातल्या विविध भागातही नागरिकांनी नववर्षाचं स्वागत केलं. नंदुरबारमधे श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्...