February 22, 2025 10:29 AM February 22, 2025 10:29 AM

views 10

न्यु इंडिया बँक घोटाळा प्रकरणी हितेश मेहता आणि धर्मेश पौन यांना पोलिस कोठडी

न्यु इंडिया सहकारी बँकेत 122 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या हितेश मेहता आणि धर्मेश पौन यांच्या पोलिस कोठडीत, मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने 28 फेब्रुवारी पर्यन्त वाढ केली आहे.   बँकेत 122 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा या दोघांवर आरोप आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु भोआन यांना काल अटक केली.

February 15, 2025 8:28 PM February 15, 2025 8:28 PM

views 12

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी हितेश मेहताला अटक

मुंबईतल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली.  हितेश मेहता यानं कोविड काळात बँकेच्या प्रभादेवी कार्यालयातून ११२ कोटी तर गोरेगावच्या कार्यालयातून १० कोटी असे एकूण १२२ कोटी रुपये इतरत्र वळवून, चोरी केल्याचा आरोप आहे.    या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, नंतर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला गेला होता.

February 14, 2025 6:54 PM February 14, 2025 6:54 PM

views 9

न्यू इंडिया सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त

रिझर्व्ह बँकेनं आज मुंबईतल्या न्यू इंडिया सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं. प्रशासनाचा दर्जा खालावल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया सहकारी बँकेवर काल विविध निर्बंध लागू केले होते. त्यानुसार बँकेला पुढले सहा महिने नवीन कर्ज देता येणार नाही तसंच बचत खातं, चालू खातं किंवा ठेवीदाराच्या इतर कुठल्याही खात्यातून रक्कम काढता येणार नाही.    स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक श्रीकांत, यांची बँकेच्या कारभाराचं व्यवस्थापन करण्यासाठी 'प्रशासक' म्हणून नियुक्त...