October 15, 2024 1:48 PM October 15, 2024 1:48 PM

views 9

जम्मू-काश्मिरमधल्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी

जम्मू-काश्मिरमधल्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या सकाळी श्रीनगरमध्ये होणार आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं. इथली राष्ट्रपती राजवट केंद्र सरकारनं परवाच उठवली होती.  

October 12, 2024 2:04 PM October 12, 2024 2:04 PM

views 6

हरियाणातल्या नव्या सरकारचा शपथविधी १७ ऑक्टोबरला

हरियाणातल्या नव्या सरकारचा शपथविधी गुरुवारी १७ ऑक्टोबरला होणार आहे. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह काही मंत्री पंचकुलामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतर राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.   नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्त्वाखालच्या आघाडीनं काल जम्मू-काश्मिरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी दावा सादर केला. नॅशनल कॉन्फरन्सच्या विधीमंडळ पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी काल नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी का...