December 25, 2024 3:27 PM December 25, 2024 3:27 PM
8
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांची बैठक सुरु
मित्रपक्षांबरोबरचा समन्वय अधिक वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीनं पुढाकार घेतला असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी एनडीए सरकारच्या घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू , केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, नागरी विमानउड्डाण मंत्री राममोहन नायडू किंजरपु यांच्यासह अनेक पक्षांचे मान्यवर उपस्थित होते.