June 25, 2024 1:59 PM June 25, 2024 1:59 PM

views 16

७वी अर्थसंकल्प पूर्व बैठक आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली

आगामी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी ७वी अर्थसंकल्प पूर्व बैठक आज नवी दिल्ली इथं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विविध व्यापार आणि सेवा पुरवठादार प्रतिनिधींसोबत सीतारामन यांनी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंता नागेश्वरन, वित्त सचिव टी . व्ही. सोमनाथन तसंच आर्थिक व्यवहार विभागाचे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते.

June 21, 2024 8:35 PM June 21, 2024 8:35 PM

views 10

नवी दिल्लीत देशातल्या शेतकरी संघटनांची आणि कृषीअर्थतज्ञांची अर्थसंकल्पपूर्व बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज नवी दिल्लीत देशातल्या शेतकरी संघटनांची आणि कृषीअर्थतज्ञांची अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. यावेळी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, अर्थविभागाचे सचिव टी.व्ही. सोमनाथन, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन आदी अधिकारी उपस्थित होते. या आधी अर्थमंत्र्यांनी आर्थिक आणि गुंतवणूक बाजारातील तज्ञांबरोबर अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली होती.

June 20, 2024 8:21 PM June 20, 2024 8:21 PM

views 18

देशाचा विकास दिव्यांगांविषयी बाळगलेल्या संवेदनशीलतेच्या आधारेच गणला जाऊ शकतो – राष्ट्रपती

एखाद्या देशाचा किंवा समाजाचा विकास त्या देशाच्या नागरिकांनी दिव्यांग जनांविषयी बाळगलेल्या संवेदनशीलतेच्या आधारेच गणला जाऊ शकतो, असं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं मांडलं. त्या पंडित दिनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय दिव्यांग संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या. समावेशी वृत्ती हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असल्याचं मुर्मू यावेळी म्हणाल्या.   मुर्मू यांनी या संस्थेतल्या दिव्यांग मुलांशी संवाद साधला. त्यांनी या संस्थेतल्या नविकृत कृत्रिम अवयव केंद्रालाही भेट दिली. ...