February 19, 2025 9:28 AM February 19, 2025 9:28 AM
8
नव्या फौजदारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जम्मूकाश्मीर प्रशासनाला आदेश
गुन्हेगारी-विरोधी तीन नव्या कायद्यांची येत्या एप्रिल महिन्यापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात शहा यांनी, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांच्या बरोबर काल नवी दिल्लीत बैठक घेतली. पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी, असं शहा यांनी सुचवलं आहे.