December 3, 2024 7:49 PM December 3, 2024 7:49 PM
8
नवे फौजदारी कायदे भारतीयांना वसाहतवादाच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करतील – प्रधानमंत्री
नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी हे देशातल्या नागरिकांसाठी राज्यघटनेत अनुस्यूत असलेल्या आदर्शांची पूर्ती करण्याच्या दिशेनं टाकलेलं ठोस पाऊल आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज हरियाणात चंडीगढ इथं नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचं लोकार्पण केल्यानंतर बोलत होते. नवे फौजदारी कायदे वसाहतवादाच्या मानसिक गुलामगिरीतून भारतीयांना मुक्त करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणी निमित्त त्यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं. या कार्यात योगदान देणाऱ्...