May 20, 2025 9:59 AM May 20, 2025 9:59 AM

views 14

पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल नेदरलँडचं कौतुक

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी नेदरलँड्समधील हेग इथं डच परराष्ट्र मंत्री कॅस्पर वेल्डकॅम्प यांची काल भेट घेतली. दोन्ही देशांची द्विपक्षीय भागीदारी आणि युरोपियन संघाशी असलेले संबंध दृढ करण्यासंदर्भात यावेळी व्यापक चर्चा झाली. असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्याचा नेदरलँडनं तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाविरुद्ध केलेल्या कारवाईला दिलेल्या समर्थनाबद्दल त्यांनी नेदरलँडसचं कौतुक केलं.