January 23, 2026 1:32 PM
26
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२९वी जयंती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते. नेताजींचा वारसा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. साहस, बलिदान आणि राष्ट्रीय एकता या आदर्श गुणांसाठी नेताजी स्मरणात राहतील, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे. अदम्य साहस, दृढ संकल्प, निर्भय नेतृत्व तसंच अखंड राष्ट्रभ...