November 6, 2025 3:29 PM November 6, 2025 3:29 PM
34
माथेरानची ‘टॉय ट्रेन’ पुन्हा धावणार
नेरळ-माथेरान दरम्यान धावणारी प्रसिद्ध ‘टॉय ट्रेन’ आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे ही ट्रेन बंद करण्यात आली होती. रोज सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी आणि 10 वाजून 25 मिनिटांनी ही ट्रेन नेरळहून निघेल तर माथेरानहून रोज दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी आणि संध्याकाळी चार वाजता नेरळकरता रवाना होईल. सहा डब्यांच्या या ट्रेन मध्ये तीन डबे द्वितीय श्रेणीचे तर ,दोन साधारण श्रेणीचे डबे असतील. पहिल्या ट्रेनमध्ये विस्टाडोम कोच असेल, तर दुसऱ्या ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास को...