August 24, 2024 10:18 AM

views 26

नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या अपघातात २७ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील 24 जणांचा समावेश आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतदेह तातडीनं महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. हे सर्व मृतदेह वायुसेनेच्या विमानानं आज नाशिक इथं आणण्यात येतील; त्यानंतर ते त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहेत.

August 21, 2024 9:53 AM

views 24

नेपाळमधून २५१ मेगावॅट वीज आयात करायला भारताची परवानगी

नेपाळमधून १२ जल विद्युत प्रकल्पामधून २५१ मेगावॅट वीज आयात करायला भारताच्या सीमापार व्यापार प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. नेपाळकडून बिहारसाठी ही वीज प्रथमच कराराच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे आता भारताकडून करण्यात येणाऱ्या वीज आयंतीत वाढ झाली असून, नेपाळमधील २८ प्रकल्पातून ९४१ मेगावॅट वीज खरेदी केली जाणार आहे. यापूर्वीच नेपाळ वीज निर्यात करणारा महत्वाचा देश बनला असून, मागील आर्थिक वर्षात नेपाळणने सुमारे १४ अब्ज डॉलर्सची वीज निर्यात केली आहे.

August 18, 2024 12:27 PM

views 21

नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर आरजू राणा देउबा आजपासून पाच दिवसीय भारत दौऱ्यावर

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून, नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर आरजू राणा देउबा यांचं पाच दिवसीय भारत दौऱ्यासाठी आज आगमन होत आहे. नेपाळ हा भारताचा अतिशय महत्वाचा भागीदार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.  या दौऱ्यात उभय देश एकमेकांना करत असलेल्या सहकार्याचा आढावा घेतला जाणार आहे. उभय देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री नेपाळ-भारत संबंध मजबूत करण्याच्या आणि सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशानं चर्चा करतील, असं नेपाळच्या परराष...

July 24, 2024 8:28 PM

views 22

काठमांडूमध्ये खासगी विमानाला झालेल्या अपघातात १८ ठार

नेपाळमधल्या काठमांडू इथल्या विमानतळावर आज सकाळी एका खासगी विमान कंपनीच्या विमानाचा अपघात झाला. यात १८ जणांचा मृत्यू झाला असून वैमानिकासह तीन प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे, अशी माहिती काठमांडूच्या वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच नेपाळचे गृहमंत्री रमेश लेहकाक यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली.

July 15, 2024 8:09 PM

views 20

नेपाळचे प्रधानमंत्री म्हणून के पी शर्मा ओली यांचा शपथविधी

नेपाळचे नवीन प्रधानमंत्री म्हणून के पी शर्मा ओली यांनी आज शपथ घेतली. नव्यानं तयार झालेल्या आघाडीतल्या चार पक्षांच्या २१ सदस्यांनीही त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी या सर्वांना पद  आणि गोपनीयतेची शपथ दिली.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी के पी शर्मा ओली यांचं अभिनंदन केलं आहे. भारत-नेपाळ मैत्री अधिक दृढ करण्यासाठी, तसंच उभयपक्षी लाभाचं सहकार्य वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याकरता आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे.  

July 12, 2024 1:41 PM

views 20

नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन बस नदीत वाहून गेल्या

नेपाळमध्ये भूस्खलन झाल्यामुळे दोन प्रवासी बस आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या नदीत वाहून गेल्या. दोन्ही बसमध्ये एकूण ६५ प्रवासी होते, यात ७ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. चितवन जिल्ह्यात नारायणघाट - मुगलिंग पट्ट्यात भूस्खलन झाल्यामुळे या बस त्रिशूली नदीत पडल्या.  यातल्या बीरगंजहून काठमांडूला चाललेल्या बसमध्ये ७ भारतीय प्रवास करत होते. नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलानं घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरु केलं असून प्रधानमंत्री पुष्पकमल दहल यांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीनं करण्याचे निर्देश दिले आहेत.

July 12, 2024 10:18 AM

views 19

नेपाळचे प्रधानमंत्री पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यावरच्या विश्वासदर्शक ठरावावर आज मतदान

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यावरच्या विश्वासदर्शक ठरावावर आज मतदान होणार आहे. 20 महिन्यात पाचव्यांदा ते विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहेत. दरम्यान नेपाळच्या संसदेतील नेपाळी काँग्रेस, नेपाळ कम्युनिस्ट पार्टी आणि जनता समाजवादी पार्टी अशा बहुसंख्य पक्षांनी आपापल्या खासदारांना या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात उभं राहावं यासाठी पक्षादेश जारी केला आहे.