January 12, 2025 11:16 AM

views 23

पुण्यातील लष्कर दिन सोहोळ्यात नेपाळ लष्कराच्या वाद्यवृंदाचा प्रथमच सहभाग

77 व्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित दक्षिण विभागाच्या सन्मान सोहोळ्यात, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते विविध पदकं देऊन, लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसंच या दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम काल घेण्यात आली. पंधरा जानेवारीला होणाऱ्या लष्कर दिन सोहोळ्यात नेपाळ लष्कराचा वाद्यवृंद प्रथमच सहभागी होणार आहे.    लष्कर दिन सोहळ्यात 7 वाद्यवृंद सहभागी होणार असून नेपाळ लष्कर वाद्यवृंद चाही यामध्ये समावेश आहे. भारतीय लष्कर दिन ...

January 9, 2025 8:04 PM

views 17

नेपाळमध्ये काठमांडू इथं ‘प्रवासी भारतीय दिन’ साजरा

नेपाळमध्ये काठमांडू इथं आज ‘प्रवासी भारतीय दिन’ साजरा करण्यात आला. नेपाळमधल्या भारतीय दूतावास आणि भारतीय नागरिक संस्थेतर्फे त्याचं  आयोजन करण्यात आलं होतं . यावेळी भारतीय नागरिक संस्थेचे अध्यक्ष मनोज कांदोई यांनी नेपाळच्या प्रगतीमध्ये भारतीय नागरिकांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. नेपाळमधले भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव आणि मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक यावेळी उपस्थित होते. 

January 8, 2025 10:11 AM

views 26

नेपाळमधील भूकंपात आत्तापर्यंत 126 जणांचा मृत्यु

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात काल झालेल्या भुकंपातील मृतांची संख्या 126 वर पोहोचली आहे. चीनच्या अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी झालेल्या 7 पूर्णांक 1 रिख्टर पातळीच्या या भूकंपामध्ये 188 लोक जखमी झाले. भूकंपाचे केंद्र तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातील झिझांग इथं होतं. इथं मालमतेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सुत्रांनी स्पष्ट केलं आहे.

January 5, 2025 2:07 PM

views 21

थाळी फेक स्पर्धेत भारतीय सैन्यदलात कार्यरत बनवीर सिंगला सुवर्णपदक

नेपाळमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या बनवीर सिंग यानं थाळी फेक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं. बनवीर सिंगनं याआधीही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पारितोषिकं पटकावली आहेत.

December 24, 2024 3:24 PM

views 24

रोजगारासाठी परदेशी जाणाऱ्या नेपाळी नागरिकांसाठी त्रिसूत्री सूचनावली प्रसिद्ध

रोजगारासाठी परदेशी जाणाऱ्या नेपाळी नागरिकांसाठी नेपाळ सरकारने एक त्रिसूत्री सूचनावली प्रसिद्ध केली आहे. म्यानमां, थायलंड, कंबोडिया आणि लाओस या देशांमध्ये रोजगारासाठी जाण्यापूर्वी नेपाळी नागरिकांनी त्यांना रोजगार देणाऱ्या परदेशी कंपन्या आणि संस्थांनी योग्य माध्यमातून व्यवस्थित माहिती घ्यावी अशी सूचना सरकारने केली आहे. आकर्षक मोबदल्याचं अमिष दाखवून परदेशी रोजगारासाठी आलेल्या नेपाळी नागरिकांचा मानवी तस्करी आणि इतर अवैध कामांसाठी वापर  केल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही सूचनावली  नेपाळ सरकारने जा...

December 18, 2024 11:05 AM

views 23

नेपाळमध्ये काठमांडू इथं भारत-नेपाळ स्टार्टअप परिषद २०२४

भारत-नेपाळ स्टार्टअप परिषद 2024 कालपासून नेपाळमध्ये काठमांडू इथं सुरू झाली. उभय राष्ट्रांमधील सहकार्य आणि नवोन्मेष यांना प्रोत्साहन देण्यासाठी या परिषदेत उद्योजक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकत्र आले आहेत. स्टार्टअप जाळं निर्माण करण्यासाठी मंच तयार करणं, नवकल्पना मांडणं, विकास आणि गुंतवणुकीच्या संधी शोधणं हे या परिषदेचं उद्दिष्टं आहे. नेपाळला भेडसावत असलेल्या बेरोजगारी, परकीय मदतीवरील अवलंबित्व, व्यापार तूट अशा विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी स्टार्टअप्स हे आशेचे किरण असल्याचं प्रतिपादन भारत-नेप...

December 18, 2024 10:44 AM

views 18

नेपाळमध्ये भक्तपूर महोत्सवाला लाखो नागरिकांची भेट

नेपाळमध्ये गेल्या १३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या भक्तपूर महोत्सवाला गेल्या पाच दिवसांत लाखो लोकांनी भेट दिली. त्यामुळे इथं प्रचंड गर्दी झाली होती. भक्तपूरच्या अद्वितीय आणि ऐतिहासिक कला, संस्कृती, उत्सव आणि जीवनशैलीची जगाला ओळख करून देणं हा महोत्सवाचा उद्देश होता. भक्तपूर हा काठमांडू खोऱ्यातील एक जिल्हा असून त्याच्या परिसरात भक्तपूर दरबार स्क्वेअर आणि चांगू नारायण मंदिर ही यूनेसकोची वारसा स्थळे आहेत. भक्तपूर दरबार चौकात पौभा चित्रकला प्रदर्शन आणि कांस्य, दगड आणि लाकडातील पारंपरिक शिल्पांचे प्रदर्श...

November 15, 2024 8:19 PM

views 20

भारतीय ग्रीडद्वारे नेपाळ ते बांगलादेशपर्यंत विद्युतप्रवाह सुरू

भारतीय ग्रीडद्वारे नेपाळ ते बांगलादेशापर्यंत विद्युतप्रवाह आज सुरू झाला. बांगलादेशाच्या ऊर्जा मंत्रालयाचे सल्लागार मोहम्मद फौजुल कबीर खान आणि नेपाळचे ऊर्जा मंत्री दीपक खडका यांच्यासमवेत केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी पहिल्या 40 मेगावॅटपर्यंतच्या विद्युतप्रवाहाचं उद्घाटन केलं. त्यामुळे भारत, नेपाळ आणि बांगलादेश यांच्या ऊर्जा सहकार्याला एक नवा आयाम मिळाला आहे, असं ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे.

September 30, 2024 7:18 PM

views 25

नेपाळमध्ये पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गीक संकटामुळे आतापर्यंत २०५ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये संततधार पावसाने आलेल्या पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गीक संकटामुळे आतापर्यंत २०५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. नेपाळच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते रिषीराम तिवारी यांनी ही माहिती दिली.  विविध नैसर्गीक संकटात २६० जण जखमी झाले आहेत.  पूर आणि भूस्खलन अशा  संकटात सापडलेल्या ४ हजार ५०० नागरिकांना मदत आणि बचाव कार्यातल्या सुरक्षादलांनी  सुरक्षित स्थळी हलवलं आहे. महामार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

September 30, 2024 12:50 PM

views 15

नेपाळमध्ये पावसाचा कहर, विविध घटनांमध्ये १३२ नागरिकांचा मृत्यू

नेपाळमध्ये संततधार पावसाने  कहर केला आहे.  पावसामुळे पूर आणि दरडी कोसळणे यासारख्या नैसर्गीक संकटांमध्ये एकूण १३२ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती नेपाळ गृहमंत्रालयाने दिली आहे. पूरपरिस्थितीमुळे काठमांडू दरी भागात ६८जण, बागमतीमध्ये ४५ ,कोशीत सतराजण तर मधेश परगण्यात दोन जणांचा मृत्यू झाला. सैन्यदलाच्या मदतीने देशभरातल्या तीन हजार सहाशे सव्वीस लोकांची सुटका केल्याचं नेपाळच्या गृहमंत्रालयानं सांगितलं.