November 13, 2025 8:30 PM

views 24

भारत आणि नेपाळ वाहतूक कराराच्या तररतूदीत सुधारणा करणाऱ्या विनिमय पत्राची देवाणघेवाण

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज त्यांचे नेपाळचे समकक्ष मंत्री अनिल कुमार सिंह यांच्याबरोबर नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत भारत आणि नेपाळ यांच्यातल्या वाहतूक कराराच्या तररतूदीत सुधारणा करणाऱ्या विनिमय पत्राची देवाणघेवाण झाली. या पत्राद्वारे जोगबनी - बिराटनगर दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरु करून कंटेनर आणि  ठोक मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे कोलकाता आणि विशाखापट्टणम बंदरातून नेपाळपर्यंत मालवाहतूक करणं सुलभ होणार आहे. बैठकीत एकीकृत चेक पोस्ट, इतर पाया...

September 13, 2025 3:09 PM

views 26

नेपाळमधे हंगामी सरकारची स्थापना

नेपाळमधल्या हंगामी सरकारच्या प्रधानमंत्री म्हणून तिथल्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी काल त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या नेपाळच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री आहेत. नवनियुक्त हंगामी प्रधानमंत्र्यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रपती पौडेल यांनी लोकसभा बरखास्त केली असून पुढच्या वर्षी ५ मार्च रोजी निवडणूक घेण्यात येईल अशी घोषणा केली. नेपाळमधल्या हंगामी सरकार स्थापनेचं भारतानं स्वागत केलं आहे.   या निर्णयामुळे नेपाळमध्ये शांतता...

September 11, 2025 1:39 PM

views 19

नेपाळमधे अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी विशेष उड्डाणांची घोषणा

नेपाळमधील अलीकडील घडामोडींमुळे तिथं अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी एअर इंडिया आणि इंडिगोनं दिल्ली ते काठमांडू आणि परत येण्यासाठी विशेष उड्डाणांची घोषणा केली आहे. नियोजित उड्डाणे सुरू झाली आहेत आणि आजपासून पुन्हा सुरू होतील असं सांगून एयर इंडियानं प्रवाशांना त्यांच्या संकेतस्थळावर उड्डाणांची स्थिती तपासण्यास सांगितलं आहे.   इंडिगोद्वारे काठमांडूसाठी दररोज चार उड्डाणं पुन्हा सुरू होतील. प्रवाशांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी समर्पित दोन विशेष मदत उड्डाणे देखील चालवली जातील असं कंपनीनं काल...

September 11, 2025 1:24 PM

views 24

नेपाळमधे अराजकाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात सुरक्षेत वाढ

नेपाळमधे अराजकाच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारच्या स्थापनेसाठी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल, लष्करप्रमुख अशोकराज सिगडल आणि तरुणांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा सुरू आहे.   अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्यासाठी युवा प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सुशीला कार्की यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची  माहिती सूत्रांनी दिली. १९८९ नंतर सार्वजनिक पदांवर असलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी, युवा वर्गाच्या प्रतिनिधींना समाविष्ट करण्यासाठी संसदेची निवडणूक आणि थेट निवड...

September 11, 2025 1:14 PM

views 19

नेपाळमधे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सूरु

नेपाळमधे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली. ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. 

September 10, 2025 9:03 AM

views 14

भारतील नेपाळसाठी जाणाऱ्या विमानसेवा स्थगित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक काल घेतली. नेपाळ मधील हिंसा ही हृदय द्रावक आहे. नेपाळमधील तरुणांच्या जिवीतहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं तसंच नेपाळच्या स्थिरता,शांती आणि समृद्धीच महत्व आपल्या समाज मध्यमांवरील संदेशामधून अधोरेखित केलं.    दरम्यान नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा. जे नागर...

September 9, 2025 1:21 PM

views 16

नेपाळमधील काठमांडूमधे बेमुदत संचारबंदी लागू, ४ मंत्र्यांचे राजीनामे

नेपाळमधे समाज माध्यमांवरच्या बंदीविरोधात तरुणांच्या आंदोलनावर गोळीबारानंतर आज काठमांडू, पोखरा, इटहरी यासह अनेक शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काल मोर्चावर केलेल्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाला, तर ३४० पेक्षा जास्त जण जखमी झाले, याची जबाबदारी घेत नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला. गोळीबाराच्या घटनेमुळे लेखक यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडूनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.  रमेश लेखक यांच्यासह आरोग्य मंत्री प्रद...

June 27, 2025 11:04 AM

views 18

संस्कृत भाषा ही जगाचं वैभव असून या भाषेचा तसंच साहित्य आणि संस्कृती यांचा दक्षिण आशियावर मोठा प्रभाव आहे-नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल

संस्कृत भाषा ही जगाचं वैभव असून या भाषेचा तसंच साहित्य आणि संस्कृती यांचा दक्षिण आशियावर मोठा प्रभाव आहे, असं नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी म्हटलं आहे. काठमांडू इथं कालपासून आयोजित करण्यात आलेल्या 19 व्या जागतिक संस्कृत परिषदेत राष्ट्रपती पौडेल बोलत होते. पाच दिवस चालणाऱ्या या 19 व्या जागतिक संस्कृत परिषदेचं आयोजन नेपाळ संस्कृत विद्यापीठानं केलं आहे. जगभरातील अभ्यासक, संशोधक यामध्ये सहभागी झाले आहेत.

March 19, 2025 10:56 AM

views 23

नवी दिल्लीत भारत – नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये बैठक

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री डॉ. आरझू राणा देऊबा यांच्यात नवी दिल्ली इथे बैठक झाली. यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला, विविध क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या सहकार्यावर आणि लोकांमधील संबंध आणि राजनैतिक देवाणघेवाण वाढवण्यावर चर्चा केली.   भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या रायसीना संवाद 2025 च्या 10 व्या आवृत्तीच्या निमित्ताने ही भेट झाली. मंत्री डॉ. राणा यांनी या बैठकीला 'अत्यंत फलदायी संवाद' असं म्हटलं आहे.

January 28, 2025 10:20 AM

views 22

भारत-नेपाळ यांच्यात संयुक्त प्रकल्प देखरेख समितीची पाचवी बैठक

भुकंपानंतर पुनर्बांधणी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल भारत-नेपाळ यांच्यादरम्यान स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त प्रकल्प देखरेख समितीची पाचवी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नेपाळमध्ये भारत सरकारच्या सहाय्याने भूकंपोत्तर पुनर्बांधणी प्रकल्पांच्या प्रगतीचा व्यापक आढावा घेण्यात आला. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व उत्तर भागाचे अतिरिक्त सचिव मुनू महावर यांनी केलं तर नेपाळच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव पद्मकुमार मैनाली यांनी केलं. 2015 च्या विनाशकारी भुकंपानंतर, भारताने नेपाळला अडीचश...