August 2, 2024 3:41 PM August 2, 2024 3:41 PM

views 9

नीट युजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं केलं १३ आरोपींच्या विरोधात पहिलं आरोपपत्र दाखल

नीट युजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल बिहारमध्ये १३ आरोपींच्या विरोधात पहिलं आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात पेपरफुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मनिष प्रकाश, सिकंदर यादवेंदु आणि इतर ११ जणांनर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नीट युजी पेपरफुटी प्रकरणात बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आंतर राज्य टोळीचा छडा लावला होता. या प्रकरणात आतापर्यंत ४० जणांना अटक झाली असून ते पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी पुढला तपास सुरु आहे.

July 1, 2024 3:44 PM July 1, 2024 3:44 PM

views 18

नीट युजी परीक्षेतल्या गैरप्रकारांसंदर्भात गुजरातमधे एका खासगी शाळेच्या मालकाला अटक

नीट युजी परीक्षेतल्या गैरप्रकारांसंदर्भात सीबीआयने गुजरातमधे एका खासगी शाळेच्या मालकाला अटक केली आहे. ५ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचं केंद्र या शाळेतही होतं. गुजरात पोलिसांनी यापूर्वी ५ जणांना अटक केली असून नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी किमान २७ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयने चौकशी हातात घेतल्यावर या अरोपींचा ताबा मागितला आहे.

June 30, 2024 8:11 PM June 30, 2024 8:11 PM

views 9

नीट पेपरफुटीप्रकरणी बिहारमधल्या बेऊर कारागृहातल्या आरोपींची सीबीआय चौकशी

नीट यूजी परीक्षेतल्या कथित पेपरफुटीप्रकरणी सीबीआयनं आज बिहारमधल्या बेऊर कारागृहातल्या आरोपींची चौकशी केली. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं इतर गुन्ह्यात अटक केलेल्या तेरा आरोपींची चौकशीही सीबीआनीयनं केली आहे. पेपरफुटीप्रकरणी बिहार आणि झारखंडमधून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.