July 4, 2025 7:56 PM July 4, 2025 7:56 PM

views 13

सर्वोच्च न्यायालयाचा एनईईटी यूजीच्या अंतिम निकालांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार

सर्वोच्च न्यायालयानं वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (एनईईटी यूजी)२०२५ च्या अंतिम निकालांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. एका प्रश्नासाठी अनेक योग्य उत्तरे असू शकतात, राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेच्या अंतिम उत्तरांत या टप्प्यावर हस्तक्षेप करता येणार नाही असं न्यायाधीश पी. एस. नरसिंहा आणि आर. महादेवन यांच्या पीठानं म्हटलं आहे. एनईईटी यूजी २०२५चा अंतिम निकाल चुकीचा आणि मनमानी असल्याच्या विरोधात न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्व...

June 14, 2025 3:01 PM June 14, 2025 3:01 PM

views 13

वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा नीट २०२५चा निकाल जाहीर

वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा नीट २०२५ चा  निकाल जाहीर  झाला  असून त्यात महाराष्ट्राच्या कृशांग जोशीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. राजस्थानच्या महेश जोशीने प्रथम क्रमांक तर मध्य प्रदेशच्या उत्कर्ष अवधियाने दुसरा क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या ntaneet.nic.in या संकेतस्थळावर तपशीलवार निकाल उपलब्ध आहे. देशभरातल्या ५५२ आणि देशाबाहेरच्या १४ शहरांमध्ये ४ मे रोजी आयोजित केलेल्या या  परीक्षेला २२ लाखांहून अधिक उमेदवार बसले होते.