August 2, 2024 3:41 PM

views 19

नीट युजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं केलं १३ आरोपींच्या विरोधात पहिलं आरोपपत्र दाखल

नीट युजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल बिहारमध्ये १३ आरोपींच्या विरोधात पहिलं आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात पेपरफुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मनिष प्रकाश, सिकंदर यादवेंदु आणि इतर ११ जणांनर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नीट युजी पेपरफुटी प्रकरणात बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आंतर राज्य टोळीचा छडा लावला होता. या प्रकरणात आतापर्यंत ४० जणांना अटक झाली असून ते पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी पुढला तपास सुरु आहे.

July 21, 2024 8:25 PM

views 17

यंदाच्या नीट यूजी परीक्षेत २ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी ७०० किंवा त्याहून जास्त गुण

यंदाच्या नीट यूजी परीक्षेत २३ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते आणि त्यापैकी २ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी ७०० किंवा त्याहून जास्त गुण मिळवले होते,अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. २५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशामधल्या २७६ शहरांमध्ये १ हजार ४०४ केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

July 8, 2024 7:14 PM

views 44

नीट युजी पेपर फुटी प्रकरणी अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला आदेश

पेपर फुटीची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणावर असेल तरच फेरपरीक्षेचा विचार केला जाईल, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. नीट युजी पेपर फुटीच्या प्रकरणासंदर्भातला अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिला आहे. हे दोन्ही अहवाल बुधवारी संध्याकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  नीटची फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी करणाऱ्या ...