July 25, 2024 8:25 PM July 25, 2024 8:25 PM

views 21

नीट युजी-२०२४ परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर

राष्ट्रीय चाचणी संस्थेनं नीट युजी- २०२४ परीक्षेचा सुधारित निकाल आज जाहीर केला. भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतल्या वादग्रस्त ठरलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय विचारात घेऊन हा सुधारित निकाल देण्यात आला आहे. या प्रश्नाच्या योग्य उत्तराबाबत निर्णय घेण्यासाठी तज्ञांची समिती नेमण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी दिली होती. त्या अनुषंगानं स्थापन झालेल्या आय आय टी दिल्लीच्या तज्ञांच्या समितीनं या प्रश्नाच्या चौथ्या पर्यायाची योग्य उत्तर म्हणून निवड केली. नीट युजी परीक्षा रद्द करण्याबाबतच्या सर्व ...

July 23, 2024 6:07 PM July 23, 2024 6:07 PM

views 8

नीट – युजी २०२४ परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

पेपर फुटी आणि गैरप्रकार या कारणांमुळं नीट - युजी २०२४ ही परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यंत्रणेतल्या त्रुटीमुळे पेपर फुटले असल्याचा कुठलाही पुरावा नाही. पुनर्परीक्षा घेतली तर २३ लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होईल आणि शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत होईल, असं न्यायालयानं सांगितलं.

July 19, 2024 9:53 AM July 19, 2024 9:53 AM

views 15

नीट-यूजी परीक्षेचा केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश

नीट युजी २०२४ परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल,उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय चाचणी संस्थेला दिले आहेत. नीट युजी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात दाखल झालेल्या ४० याचिकांची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर कालपासून सुरु झाली, त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले.   एनटीएने शहर आणि परीक्षा केंद्राच्या तपशिलासह, परीक्षार्थींची ओळख कोणत्याही प्रकारे न दड...