March 13, 2025 1:43 PM March 13, 2025 1:43 PM
26
नीट परीक्षेतली पेपरफुटी हे केंद्र सरकारचं अपयश – राहुल गांधी
नीट परीक्षेतली पेपरफुटी हे केंद्र सरकारचं अपयश आहे. या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि सरकारांनी मतभेद बाजूला सारत एकत्र येऊन मार्ग काढण्याची गरज असल्याचं मत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे त्यांनी नीट पेपरफुटी प्रश्नी सरकारवर टीका केली. सहा राज्यांतल्या ८५ लाख मुलांचं भविष्य या पेपरफुटीमुळे टांगणीला लागलं आहे. तरुणासांठी हा धोकादायक पद्मव्यूह बनला आहे, अशी टीका त्यांनी केली.