July 6, 2024 9:13 AM July 6, 2024 9:13 AM
8
स्पर्धा परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक सादर
स्पर्धा परीक्षेत गैरव्यवहार रोखण्यासाठीचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक महाराष्ट्र विधानसभेत काल मांडण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि शिक्षक पात्रता चाचणी यासह शासनाच्या विविध विभाग आणि प्राधिकरणाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना या कायद्यातील तरतुदी लागू असतील. यात अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना 3 ते 5 वर्ष शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड करण्याची तरतूद आहे. परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्था, सेवा पुरवणा...