June 6, 2025 4:58 PM

views 25

नीट परीक्षा येत्या ३ ऑगस्टला एकाच सत्रात घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा मंडळाला ३ ऑगस्ट रोजी एकाच सत्रात नीट प्रवेश परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. याआधी ही परीक्षा १५ जूनला होणार होती. मंडळानं ३ जून रोजी परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट करणं आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी वेळ वाढवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या पीठानं सुरुवातीला परीक्षा घेण्यासाठी मंडळानं मागितलेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र नंतर ३ ऑगस्ट रोजी नीट परी...

May 4, 2025 6:51 PM

views 23

वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीच्या NEET चाचणी परीक्षेचं आयोजन

वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची नीट ही चाचणी परीक्षा आज झाली. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएच्या वतीनं आज देशातल्या पाच हजार केंद्रावर आणि परदेशातील तेरा केंद्रांमध्ये ही परीक्षा झाली. या परीक्षेसाठी साडेबावीस लाखांहून अधिक, तर राज्यात ३५ शहरांमध्ये दोन लाख ७९ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

July 1, 2024 3:42 PM

views 28

नीट फेरपरीक्षेचे निकाल जाहीर

राष्ट्रीय चाचणी संस्थेने आज नीटच्या फेरपरीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. ५ मे रोजी झालेल्या परीक्षेत ग्रेस गुण मिळालेल्या १ हजार ५६३ विद्यार्थ्यांची फेर परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आली. एकूण ८१३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. निकाल एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  

June 24, 2024 7:49 PM

views 22

नीट परीक्षा घोटाळ्यात लातूरमध्ये अटकेत आरोपीला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

    नीट परीक्षा घोटाळ्यात लातूरमध्ये अटकेत असलेल्या एका आरोपीला न्यायालयानं २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. याप्रकरणी ४ जणांविरोधात दहशतवाद विरोधी पथकानं चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातल्या एकाला पोलिसांनी काल अटक केली होती. इतर दोघांची चौकशी सुरू आहे आणि दिल्लीतल्या चौथ्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिस पथक जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

June 24, 2024 7:15 PM

views 13

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचं पथक गुजरातमध्ये दाखल

NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचं एक पथक गुजरातमधल्या गोध्रा इथं दाखल झालं आहे. गोध्रा इथल्या एका परीक्षा केंद्रावर ५ मे रोजी NEET चा पेपर झाल्यानंतर तीन दिवसांनी तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये परीक्षेतल्या गैरप्रकाराबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला होता. गोध्रा पोलिसांनी या प्रकरणात ३० विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे.   दरम्यान, गुजरातमधल्या पंचमहाल जिल्हा न्यायालयाच्या सत्र ...

June 23, 2024 3:17 PM

views 22

नीट-यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या सर्व १,५६३ विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट-यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या सर्व एक हजार ५६३ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आज होणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणांच्या आधारे या विद्यार्थ्यांना दिलेले अतिरिक्त गुण रद्द करून फेरपरीक्षेचा निर्णय घेतल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा द्यायची नसेल, त्यांना अतिरिक्त गुणांविना मिळालेले गुण ग्राह्य धरले जातील, अ...

June 20, 2024 8:27 PM

views 12

राहुल गांधी नीट प्रकरणाचं राजकारण करत आहेत – सुधांशु त्रिवेदी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी काही देणंघेणं नसून ते नीट प्रकरणाचं राजकारण करत आहेत, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी आज केली. सरकार नीट प्रकरणाबाबत संवेदनशील असून विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही. तसंच दोषींवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्रिवेदी यांनी दिली.   त्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेतल्या अनियमिततेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसंच हे राष्ट्रीय संकट असून सरकारने यावर काहीही प्रतिक्रि...

June 20, 2024 3:50 PM

views 19

नीट परीक्षा : राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या याचिकेसंदर्भात संबंधितांना नोटीस

यंदाच्या नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेशी निगडित उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित सर्व खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज संबंधितांना नोटीस बजावली. तसंच सर्वोच्च न्यायालयानं विविध उच्च न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या नीट संदर्भातल्या सर्व कार्यवाहीला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भट्टी यांच्या पीठानं हे निर्देश दिले. या सर्व याचिकांवरची सुनावणी येत्या ८ जुलैला ...