June 19, 2025 1:11 PM June 19, 2025 1:11 PM
8
नीट एमबीबीएस प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी ठिकठिकाणी ED चे आज छापे
नीट एमबीबीएस प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी बिहारमध्ये पाटणा, झारखंडमध्ये रांची आणि इतर काही ठिकाणी सक्तवसुली संचालनालयानं आज छापे टाकले. प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणातील मुख्य सूत्रधार संजीव मुखिया आणि त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींच्या ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.