September 20, 2024 8:16 PM September 20, 2024 8:16 PM

views 15

NEET UG 2024 प्रश्नपत्रिकांची चोरी प्रकरणी ६आरोपींविरुद्ध दुसरं आरोपपत्र दाखल

NEET UG 2024 प्रश्नपत्रिकांची चोरी आणि पेपरफुटीच्या प्रकरणात सहा आरोपींविरुद्ध सीबीआयनं पाटणा इथल्या सीबीआय न्यायालयात दुसरं आरोपपत्र दाखल केलं आहे. भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या तरतुदींअंतर्गत हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं.   याव्यतिरिक्त, NEET UG 2024 परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी असलेले शहर समन्वयक आणि ओएसिस स्कूलचे प्राचार्य डॉ. एहसान उल हक आणि केंद्र अधीक्षक म्हणून नियुक्त केलेले उप-प्राचार्य मोहम्मद इम्तियाज आलम यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या विविध कलमांतर्गत आ...

July 1, 2024 3:44 PM July 1, 2024 3:44 PM

views 18

नीट युजी परीक्षेतल्या गैरप्रकारांसंदर्भात गुजरातमधे एका खासगी शाळेच्या मालकाला अटक

नीट युजी परीक्षेतल्या गैरप्रकारांसंदर्भात सीबीआयने गुजरातमधे एका खासगी शाळेच्या मालकाला अटक केली आहे. ५ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचं केंद्र या शाळेतही होतं. गुजरात पोलिसांनी यापूर्वी ५ जणांना अटक केली असून नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी किमान २७ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयने चौकशी हातात घेतल्यावर या अरोपींचा ताबा मागितला आहे.

June 27, 2024 10:21 AM June 27, 2024 10:21 AM

views 6

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील ४ पैकी २ संशयित आरोपी अद्याप फरार

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या दोन आरोपी शिक्षकांकडे ज्या १२ विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सापडली आहेत, त्यातील काही विद्यार्थ्यांच्या पालकांची लातूर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या आमिषाला बळी पडत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरोपींसोबत आर्थिक व्यवहार केल्याची माहिती आहे.   नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील चार पैकी दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत. दिल्ली इथल्या गंगाधर नावाच्या संशयितांच्या शोधासाठी लातूर पोलिसांचं एक पथक उत्तराखंडमध्ये डेहराडू...

June 23, 2024 3:17 PM June 23, 2024 3:17 PM

views 15

नीट-यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या सर्व १,५६३ विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट-यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या सर्व एक हजार ५६३ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आज होणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणांच्या आधारे या विद्यार्थ्यांना दिलेले अतिरिक्त गुण रद्द करून फेरपरीक्षेचा निर्णय घेतल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा द्यायची नसेल, त्यांना अतिरिक्त गुणांविना मिळालेले गुण ग्राह्य धरले जातील, अ...

June 21, 2024 10:05 AM June 21, 2024 10:05 AM

views 16

नीट परिक्षेसंबंधीत चौकशी करण्याची उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची घोषणा

वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-नीट २०२४ संबंधीत मुद्यांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय परीक्षा परिषद आणि तिच्या कार्यप्रणालीत आणखी सुधारणा करण्यासाठी या समितीकडून शिफारसी अपेक्षित असल्याचं प्रधान यांनी सांगितलं.