June 14, 2025 8:38 PM June 14, 2025 8:38 PM

views 7

नीट युजीचा निकाल जाहीर, कृशांग जोशी देशात तिसरा

वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षा नीट २०२५ चा  निकाल जाहीर  झाला  असून त्यात महाराष्ट्राच्या कृशांग जोशीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. राजस्थानच्या महेश जोशीने प्रथम क्रमांक तर मध्य प्रदेशच्या उत्कर्ष अवधियाने दुसरा क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या ntaneet.nic.in या संकेतस्थळावर तपशीलवार निकाल उपलब्ध आहे. देशभरातल्या ५५२ आणि देशाबाहेरच्या १४ शहरांमध्ये ४ मे रोजी आयोजित केलेल्या या  परीक्षेला २२ लाखांहून अधिक उमेदवार बसले होते.

June 6, 2025 4:58 PM June 6, 2025 4:58 PM

views 17

नीट परीक्षा येत्या ३ ऑगस्टला एकाच सत्रात घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा मंडळाला ३ ऑगस्ट रोजी एकाच सत्रात नीट प्रवेश परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. याआधी ही परीक्षा १५ जूनला होणार होती. मंडळानं ३ जून रोजी परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट करणं आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी वेळ वाढवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या पीठानं सुरुवातीला परीक्षा घेण्यासाठी मंडळानं मागितलेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र नंतर ३ ऑगस्ट रोजी नीट परी...

June 2, 2025 8:16 PM June 2, 2025 8:16 PM

views 3

येत्या १५ तारखेला होणार असलेली NEET परीक्षा पुढं ढकलली

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी येत्या १५ तारखेला होणार असलेली NEET परीक्षा पुढं ढकलली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळानं याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. अधिक परीक्षा केंद्रं आणि पायाभूत सुविधांची व्यवस्था करण्यासाठी परीक्षा पुढं ढकलली आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.  

July 24, 2024 12:29 PM July 24, 2024 12:29 PM

views 7

नीट आणि अर्थसंकल्पातल्या तरतुदींवरुन विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याची रवी शंकर प्रसाद यांची टीका

नीट आणि अर्थसंकल्पातल्या तरतुदींवरुन विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका भाजपा नेते रवी शंकर प्रसाद यांनी आज केली. नीट परीक्षेचे आयोजन योग्यरित्या झालं असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. परीक्षेच्या संदर्भातल्या अनियमितता लक्षात आल्यावर सरकारने तत्काळ सीबीआय चौकशी सुरू केली होती, असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जगात भारताची नकारात्मक प्रतिमा तयार केली आहे. अर्थसंकल्पात सर्व समाज घटकांसाठी तरतुदी केल्या आहेत. त्यामुळं विरोधीपक्षांनी अर्थसंकल्प नीट वाचून समज...

July 24, 2024 10:07 AM July 24, 2024 10:07 AM

views 7

नीट परीक्षेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून स्वागत

नीट परीक्षेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वागत केलं असून, शेवटी सत्याचा विजय झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेला त्रुटीमुक्त संस्था बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, नीट घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना सोडलं जाणार नाही, असंही प्रधान यांनी स्पष्ट केलं. एनटीएच्या संपूर्ण सुधारणेसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, समितीनं तज्ज्ञांची मतं जाणून घेतली आहेत आणि विविध पद्धतींचा अभ्यास केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते ...

July 21, 2024 10:42 AM July 21, 2024 10:42 AM

views 11

नीट परीक्षा प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात आणखी तीन आरोपींना सीबीआयकडून अटक

केंद्रीय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिकाफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं आणखी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. यापैकी दोघे राजस्थानच्या भरतपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच मे रोजी झालेल्या परीक्षेच्या दिवशी या दोघा आरोपींच्या उपस्थितीची तांत्रिक पुष्टी करण्यात आली आहे. तर अटक करण्यात आलेली तिसरी व्यक्ती ही मुख्य सुत्रधाराचा मुख्य सहकारी आहे.

July 16, 2024 3:36 PM July 16, 2024 3:36 PM

views 7

नीट पेपर फुटी प्रकरणी झारखंडमध्ये एकाला अटक

नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने काल रात्री झारखंडमधे हजारीबाग इथल्या एका गेस्ट हाऊसमधून एकाला अटक केली आहे. त्याच बरोबर हजारीबाग इथून अटक झालेल्यांची संख्या ५ झाली आहे. या व्यक्तीच्या ताब्यातून महत्त्वाची कागदपत्रं जप्त केल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे.

July 9, 2024 10:32 AM July 9, 2024 10:32 AM

views 9

नीट युजी पेपरफुटी प्रकरणी अहवाल सादर करण्याचे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला निर्देश

नीट युजी पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत काय पावलं उचलली याची माहिती देणारी प्रतिज्ञापत्रं उद्या संध्याकाळपर्यंत न्यायालयात सादर करावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. तसंच या प्रकरणाच्या तपासाचा सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. नीटची फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेसह विविध ३८ याचिकांवर काल सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे.  

June 25, 2024 1:39 PM June 25, 2024 1:39 PM

views 2

नीट संदर्भात विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेण्यावर केंद्र सरकारनं स्थापन केलेली समिती भर देणार

राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीतपणे पार पडाव्यात, यासाठी शिक्षण मंत्रालयाने गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक काल झाली. विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेणं, हे समितीचं पहिलं प्राधान्य असून, त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जाईल, असं समितीचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली इथं बातमीदारांना सांगितलं. विद्यार्थ्यांचा तणाव आणि समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक मजबूत प्रणाली स्थापन करण्याचा समितीचा विचार असल्याचं ते य...

June 23, 2024 1:41 PM June 23, 2024 1:41 PM

views 10

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी आज होणारी नीट-PG प्रवेश परीक्षा लांबणीवर

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे आयोजित, आज होणारी नीट-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरात लवकर जाहीर केली जाईल. काही स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेबाबत झालेल्या आरोपांच्या अलीकडच्या घटना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. नीट-PG प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेचं सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.