October 3, 2025 3:22 PM October 3, 2025 3:22 PM

views 280

विष्णूदास भावे पुरस्कार ख्यातनाम अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर

सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदीर समितीचा विष्णूदास भावे पुरस्कार ख्यातनाम अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली.