April 22, 2025 6:44 PM April 22, 2025 6:44 PM

views 51

साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हेंची कांबळे कुटुंबीयांना भेट

बीड इथं साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कांबळे कुटुंबाची भेट घेतली.   या भेटीनंतर गोऱ्हे यांनी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाचा आढावा घेत सूचना केल्या. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांबरोबर घेतलेल्य बैठकीत छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना गोऱ्हे यांनी दिल्या.   त्यानुसार आता बीडमध्ये प्रत्येक महाविद्यालयात बडी कॉप कार्यरत केले जाणार असून यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सहज तक्रार करता येणार आहे. 

March 19, 2025 6:41 PM March 19, 2025 6:41 PM

views 18

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव मंजूर

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आज विधानपरिषदेत आवाजी मतदानानं मंजूर झाला. यावर बोलू देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. सभापतींनी ती फेटाळून लावली. विरोधी पक्षांनी आपली मागणी लावून धरल्यानं सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे सभापतींनी कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केलं.   विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव नियमबाह्य पद्धतीने आणल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला. हा ठराव कोणत्या नियमानुसार मांडला याचा खुलासा करावा अ...

September 5, 2024 9:51 AM September 5, 2024 9:51 AM

views 10

महिलेवरील अत्याचारासाठी फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपतींना विनंती

महिला आणि अल्पवयीन मुलींसंदर्भातल्या गुन्ह्यांसाठी ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे गुन्हेगार अनेकदा दयेचा अर्ज करतात. त्यांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा, अशी विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली आहे. डॉक्टर गोऱ्हे यांनी काल मुंबईत राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन सादर केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आरोपींकडून आलेले दयेचे अर्ज अनेकदा प्रलंबित राहतात आणि त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही ...

August 13, 2024 4:55 PM August 13, 2024 4:55 PM

views 9

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे, सामान्या प्रशासन विभाग राजशिष्टाचाराच्या २ ऑगस्टच्या निर्णयानुसार हा दर्जा दिल्याची माहिती  राज्य विधानमंडळ सचिवालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. नीलम गोऱ्हे या सन २००२ पासून विधानपरिषदेच्या सदस्या असून सध्या त्यांची सदस्यत्वाची चौथी टर्म सुरू आहे. त्या सन २०१९ पासून विधानपरिषद सभागृहाच्या उप सभापतीपदी कार्यरत आहेत.