April 15, 2025 2:46 PM April 15, 2025 2:46 PM

views 11

NDRFच्या पाचव्या बटालियनकडून अतिवृष्टी आणि आपत्ती प्रतिसाद विषयक सरावाचे आयोजन

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पाचव्या बटालियनने आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी आणि आपत्ती प्रतिसाद विषयक सराव आयोजित केले होते. पूर, दरडी कोसळणे, भूकंप तसेच रासायनिक अपघातांना त्वरित प्रतिसाद देऊन कृती करण्याच्या या सरावात १२ विशेष प्रशिक्षित पथकं सहभागी झाली होती. येत्या मान्सूनसाठी या पथकांची सज्जता तपासणे हा या सरावांमागचा हेतू होता.  

January 19, 2025 7:53 PM January 19, 2025 7:53 PM

views 11

एनडीआरएफच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्र्याचा शूर जवानांच्या कामगिरीला सलाम

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या स्थापना दिनी या दलातल्या शूर जवानांच्या कामगिरीला सलाम केला आहे. प्रधानमंत्र्यांनी या जवानांच्या धैर्य, समर्पण आणि निस्वार्थ सेवेचं  समाज मध्यमावरच्या संदेशाद्वारे कौतुक केलं आहे. आपत्ती काळात सुरक्षेची खात्री करणं, लोकांचे जीव वाचवणं यासाठी या दलाची अतूट वचनबद्धता प्रशंसनीय आहे, असंही ते म्हणाले. आपत्ती प्रतिसाद आणि व्यवस्थापनात एनडीआरएफ नं जागतिक मानक स्थापन केल्याचं त्यांनी सांगितलं.

June 24, 2024 2:59 PM June 24, 2024 2:59 PM

views 32

पहलगाम इथं अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक

  जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर अनंतनाग जिल्ह्यात पहलगाम इथं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक काल झाली. यात निवृत्त मेजर जनरल सुधीर बहल यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सहभागी असलेल्या विविध संस्था आणि विभागाच्या तयारीचा आढावा घेतला.   एनडीआरएफ, एसडीआरएफ, जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ, भारतीय हवामान विभाग, अग्निशमन दल या संस्थांनी सुधीर बहल यांच्यासमोर सादरीकरण केलं.दरम्यान, जम्मू काश्मीरच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ. मुश्ताक अहमद यांनी चंद...