May 12, 2025 11:18 AM May 12, 2025 11:18 AM
2
एनडीएमएनं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना जारी
देशातली सद्यपरिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच एनडीएमएनं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात नागरिकांनी कोणत्याही अज्ञात वस्तूला स्पर्श करु नये. त्यामध्ये स्फोटक धोकायदायक पदार्थ असू शकतात. त्यामुळे लोकांना गंभीर दुखापत होण्याचा धोका असल्याचं एनडीएमए म्हटलं आहे. अज्ञात सामग्री आढळल्यास स्थानिक अधिकाऱ्यांना कळवावे अशाही सूचना जारी करण्यात आल्या आहेत.