August 5, 2025 1:42 PM August 5, 2025 1:42 PM

views 1

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक

रालोआ म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह रालोआचे इतर खासदार यावेळी उपस्थित होते.    ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यशस्वीपणे राबवल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांचं या बैठकीत अभिनंदन केलं. ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यात सशस्त्र दलांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे त्यांच्या वचनबद्धतेचं कौतुक करणारा ठराव सर्व खासदारांनी मंजूर केला. तस...

August 5, 2025 11:04 AM August 5, 2025 11:04 AM

views 5

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय मंडळाची महत्त्वाची बैठक

राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएच्या संसदीय मंडळाची आज सकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे. एनडीएचे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. बिहारमध्ये मतदारयाद्या पुनरीक्षण मागं घेण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली असून, त्याबाबत चर्चा घेण्यासाठी ते संसदेत गोंधळ करत असल्याच्या पार्श्वभूमीवर एनडीएनं ही बैठक आयोजित केली आहे.   विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025 आणि राष्ट्रीय अंमली ...

February 20, 2025 8:17 PM February 20, 2025 8:17 PM

views 3

नवी दिल्लीत NDAच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आणि जे.पी.नड्डा देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह आंध्र प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच उत्तर प्रदेश आणि बिहारचे उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते.