November 18, 2025 8:06 PM November 18, 2025 8:06 PM

views 7

बिहारमध्ये NDAच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांची बैठक

बिहारमधे, NDA च्या विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड करण्यासाठी त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या पाटण्यात होणार आहे. NDA चे घटक पक्ष असलेल्या भाजपा, संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती पार्टी-रामविलास, हिंदुस्तानी आवाम मोर्चा, आणि राष्ट्रीय लोकमोर्चा या पाच पक्षांचे एकूण २०२ आमदार या बैठकीला उपस्थित राहतील. NDA च्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीच पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे. निवड झाल्यानंतर विधीमंडळ पक्षनेता राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे धावा करेल.    त्...

October 12, 2025 8:00 PM October 12, 2025 8:00 PM

views 64

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआचं जागावाटप निश्चित

बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप निश्चित झालं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवतील, तर लोक जनशक्ती पक्ष रामविलास या पक्षाला २९ जागा दिल्या आहेत. राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चा हे पक्ष प्रत्येकी ६ जागांवर उमेदवार उतरवतील. बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार अस...

September 30, 2025 12:39 PM September 30, 2025 12:39 PM

views 28

करूर चेंगराचेंगरी दुर्घटनेचं तथ्य शोधण्यासाठी रालोआचं शिष्टमंडळ कोइम्बतूरमध्ये दाखल

तमिळनाडूमधल्या करूर इथं सभेत चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेचं तथ्य शोधण्यासाठी खासदार हेमामालिनी यांच्या नेतृत्वाखालील रालोआचं शिष्टमंडळ आज कोइम्बतूरमध्ये दाखल झालं. या दुर्घटनेमागच्या कारणांचा शोध ही समिती घेईल, असं खासदार हेमामालिनी यांनी वार्ताहरांना सांगितलं. हे शिष्टमंडळ मृतांच्या कुटुंबीयांना तसंच जखमींना भेटणार आहे. 

December 26, 2024 12:47 PM December 26, 2024 12:47 PM

views 11

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या NDA नेत्यांची बैठक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या NDA नेत्यांची काल नवी दिल्लीत बैठक झाली. आघाडीतील भागीदारांमध्ये समन्वय भक्कम करण्याचा या बैठकीचा उद्देश होता.भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जनता दल (संयुक्त) नेते आणि केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह, जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी, अपना दल पक्षाच्या अध्यक्ष केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, तसंच ...