July 7, 2025 8:00 PM July 7, 2025 8:00 PM

views 8

विद्यादीप बालगृहातल्या ९ मुली निघून गेल्याच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

छत्रपती संभाजीनगर इथल्या विद्यादीप बालगृहातल्या ९ मुली निघून गेल्याच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. याप्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. ३० जून रोजी या मुली पळून गेल्या होत्या. त्यापैकी ७ मुलींना दामिनी पथकांनं सापडल्या आहेत.

October 19, 2024 7:53 PM October 19, 2024 7:53 PM

views 22

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती

केंद्र सरकारनं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात अधिसूचना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयानं काल जारी केला. या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या त्या पहिल्याच मराठी व्यक्ती आहेत. यापूर्वी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. सध्या त्या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आहेत.