July 21, 2024 6:43 PM July 21, 2024 6:43 PM

views 10

आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातल्या याचिकांवर २३ जुलैला सुनावणी

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या फुटीनंतर,आमदार अपात्रेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर येत्या मंगळवारी म्हणजेच २३ जुलैला सुनावणी होणार आहे. यासंदर्भात झालेल्या मागच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकर यांना संबंधित दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले होते. सुनावणीत हे दस्तऐवज सादर केले जाण्याची शक्यता आहे. मदार अपात्रतेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ग...

June 17, 2024 6:38 PM June 17, 2024 6:38 PM

views 11

सुनील तटकरे उद्यापासून विधानसभा मतदारसंघांच्या दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उद्यापासून राज्याच्या विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून हा दौरा सुरु होईल. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यकारणी आणि आमदारांच्या बैठकीत तटकरे यांनी या दौऱ्याची घोषणा केली होती. या दोन दिवसांच्या दौऱ्यात तटकरे अहमदनगर शहर, अहमदनगर दक्षिण ग्रामीण, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर नेवासा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे.

June 16, 2024 8:06 PM June 16, 2024 8:06 PM

views 16

कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मंत्री छगन भुजबळ अडचणीत

कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी येत्या २८ तारखेला होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचे स्पष्ट आदेश मुंबईतल्या सत्र न्यायालयानं राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना दिले आहेत. सुनावणीला गैरहजर राहिले तर वॉरंट बजावण्याचा इशाराही न्यायालयानं दिला आहे.   मुंबईत कलिना इथं राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारणीच्या कंत्राटामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळ यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणी सुनावणी पुढं ढकलण्यासाठी भुजबळ यांनी अर्ज दाखल केला होत...

June 17, 2024 2:30 PM June 17, 2024 2:30 PM

views 14

‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधे राष्ट्रवादी काँग्रेस ८५ ते ९० जागा मागणार’

आगामी विधानसभा निवडणुकीत ८५ ते ९० जागा लढवण्याचा इरादा राष्ट्रवादी काँग्रेसनं व्यक्त केला आहे. महायुतीमधे तेवढ्या जागा पक्ष मागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी आज गोंदिया इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. लोकसभा निवडणुकीत NDA ला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी विधानसभा निवडणुकीत चित्र बदलेल असं ते म्हणाले.   राज्यात लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं. केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मंत्रीपद आलं तर ते मलाच मिळेल, असं ते म्ह...

June 13, 2024 9:10 PM June 13, 2024 9:10 PM

views 76

राज्यसभेसाठी बिनविरोध निवडून येण्याचा सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा

राज्यसभा निवडणुकीसाठी बिनविरोध निवडून येण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याशिवाय इतर कुणीही अर्ज भरलेला नाही. उद्या अर्जाची छाननी होईल, त्यानंतर त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होऊ शकते.  प्रफुल्ल पटेल यांनी कालावधी पूर्ण होण्याआधीच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानं ही निवडणूक होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत बुधवारी रात्री त्यांच्या नावावर सहमती झाली, त्यांच्या उमेदवारीव...