November 15, 2024 6:54 PM

views 23

अकोले तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होईल, अजित पवारांचं आश्वासन

अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यातल्या नागरिकांच्या सिंचनाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय निळवंडे प्रकल्पातून झाली आहे. आगामी काळात अकोले तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होईल. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक लवकरच उभारण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. अहिल्यानगरमध्ये प्रचार सभेत ते बोलत होते.

November 8, 2024 7:40 PM

views 21

राष्ट्रवादी काँग्रेसची बंडखोर पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

विधानसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या आठ पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. या पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पक्षाची आणि महायुती सरकारची प्रतिमा मलीन केल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. बापू भेगडे, कृष्णा अंधारे, विश्वंभर पवार, पूजा व्यवहारे, ज्ञानेश्वर भामरे, ममता शर्मा, धनेंद्र तुरकर आणि आनंद सिंधीकर या पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 

November 6, 2024 7:00 PM

views 19

राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचं स्पष्ट करणार – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचं स्पष्ट करणारं जाहीर प्रकटन ३६ तासांच्या आत मराठीसह इतर भाषांमधल्या वृत्तपत्रांमध्ये ठळक पद्धतीनं छापू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी सूचनेनंतर अजित पवार यांचे वकील बलबीर सिंह यांनी पवारांच्या वतीनं ही हमी दिली. विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं केली होत...

October 26, 2024 10:08 AM

views 20

नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सात उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून चिखलीकर यांना, मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दिकी, अणुशक्तीनगर मतद...

October 25, 2024 4:54 PM

views 29

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज पक्षाची दुसरी यादी जाहीर केली. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याची घोषणा केली. यात अणुशक्तीनगर इथून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक, इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, तासगाव - कवठे महांकाळ मधून संजय पाटील, वडगाव शेरी इथून सुनील टिंगरे, शिरूर इथून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी देण्य़ात आली आहे. दरम्यान, काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी आणि भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवे...

October 23, 2024 7:29 PM

views 23

काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके, येवला मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. त्यानंतर सुलभा खोडके यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

October 23, 2024 2:18 PM

views 26

राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ३८ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.   छगन भुजबळ येवल्यातून, दिलीप वळसे पाटील आंबेगाव इथून, हसन मुश्रीफ कागलमधून, तर धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिंडोरीतून, धर्मराव आत्राम यांना अहेरीतून, तर अदिती तटकरे यांना श्रीवर्धन इथून राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केली आहे.

October 22, 2024 3:06 PM

views 22

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार नितीन पाटील, सयाजी शिंदे, आमदार अमोल मिटकरी यांच...

October 19, 2024 3:02 PM

views 17

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीरनामा समिती स्थापन

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. समितीचे निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड करण्यात आली असून या समितीत राज्यातले विद्यमान मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

October 17, 2024 7:26 PM

views 18

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या ६०० पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या ६०० पदाधिकाऱ्यांनी नुकताच सामूहिक राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये संधी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले असून त्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे.