August 9, 2025 12:58 PM August 9, 2025 12:58 PM

views 22

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं राज्यभरात आजपासून जनजागृती अभियान

लोकसभा निवडणुकीत बनावट मतदान झाल्याचं सादरीकरण राहुल गांधी यांनी सखोल अभ्यास करून केलं आहे, मात्र निवडणूक आयोगानं गांधी यांना शपथपत्र सादर करायला सांगितलं हे योग्य नाही असं मत शरद पवार यांनी मांडलं. ते आज नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपासंदर्भात निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करायला हवी, असं पवार म्हणाले. यावर मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताने पवार म्हणाले की आक्षेप मुख्यमंत्र्यांवर नसून निवडणूक आयोगाबाबत आहे, त्यामुळे आयोगाकडून उत...

December 21, 2024 2:47 PM December 21, 2024 2:47 PM

views 8

शरद पवार यांचं देशमुख कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे कुणी जबाबदार असतील, त्यांना तातडीनं धडा शिकवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी आज मस्साजोग गावाला भेट दिली आणि देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल, असं शरद पवार म्हणाले. जे घडलं त्यामुळे सर्वसामान्य लोकांना धक्का बसला असून या घटनेच्या खोलात जाऊन तपास करायची गरज त्या...

December 1, 2024 7:05 PM December 1, 2024 7:05 PM

views 2

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड, तर मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. तसंच पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील, तर प्रतोदपदी उत्तम जानकर यांची निवड केल्याचंही त्यांनी जाहीर केलं. विधिमंडळ पक्षनेतेपदाचा निर्णय या बैठकीत झाला नसून येत्या काळात याबाबत पुन्हा बैठक घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवा...