November 22, 2025 3:54 PM

views 37

राष्ट्रीय छात्र सेना-NCC ची क्षमता १७ लाखांवरून २० लाखापर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार

राष्ट्रीय छात्र सेना-NCC ची क्षमता १७ लाखांवरून २० लाखापर्यंत वाढवण्याचा आणि राष्ट्रीय विकास तसंच राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात विविध कार्यक्रमांत एनसीसीचा सहभाग वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. सुरक्षा सचिव राजेश कुमार सिंह यांनी ७८ व्या राष्ट्रीय छात्र सेना दिनानिमित्तानं नवी दिल्लीत राष्ट्रीय समर स्मारकावर पुष्पांजली अर्पण केल्यानंतर ही माहिती दिली. देशाच्या प्रगतीत युवा पिढीची प्रमुख भूमिका आहे. युवा पिढीची शक्ती आणि क्षमता यांचं उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रीय छात्र सेना असल्याचंही त्यांनी सांगितलं....

May 19, 2025 12:06 PM

views 15

एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा

राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी नुकतंच माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर केलं आहे. हवामान आणि प्रादेशिकतेच्या अत्यंत कठीण आव्हानांचा सामना करत या 18-19 वर्षांच्या छात्रांनी एव्हरेस्टवर तिरंगा आणि एनसीसीचा ध्वज फडकवला. सियाचीन इथल्या लष्कराच्या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेत एनसीसीच्या देशभरातल्या निवडक 15 छात्रांना गिर्यारोहणाचं बर्फाळ प्रदेशाबाबतचं आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आलं होतं.   त्यातील 10 छात्रांची या मोहीमेसाठी निवड करण्यात आली होती. नेपाळमधल्या शेर्पां...