January 13, 2025 8:19 PM January 13, 2025 8:19 PM

views 6

भारताला २०२७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यात युवकांचा महत्त्वाचा वाटा-अनिल चौहान

भारताला २०२७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यात देशातल्या युवकांचा वाटा मोठा असेल, असं सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. जनरल चौहान यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात छात्रांना मार्गदर्शन केलं, त्यावेळी ते बोलत होते. या छात्रांनी गेल्या वर्षभरात, एक पेड माँ के नाम अभियानात १ लाखाहून अधिक वृक्षारोपण केल्याबद्दल तर पुनीत सागर अभियानात ३२७ टन कचरा गोळा केल्याबद्दल सरसेनाध्यक्षांनी त्यांचं कौतुक केलं. या छात्रांनी कधीही हार मनू नये आणि राष्ट्र उभारणीत योगद...

November 30, 2024 7:08 PM November 30, 2024 7:08 PM

views 8

एनसीसीमध्ये मुलींचा सहभाग वाढला पाहिजे – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते आज मुंबईत के सी महाविद्यालयात ‘एनसीसीच्या माध्यमातून कॅडेट मुलींचे सक्षमीकरण’ या विषयावरच्या चर्चासत्रचं उद्घाटन झालं. या सत्रात त्यांनी योग आणि ध्यानधारणेचं महत्त्व विशद करत एनसीसी मध्ये मुलींचा सहभाग वाढला पाहिजे अशी आशा व्यक्त केली. यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढून नेतृत्व गुणांचा विकास होतो असं ते म्हणाले. या प्रसंगी एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंह, सैन्यलातले अधिकारी, जवान आणि एन सी सी कॅडेट्स उपस्थित होते.

September 22, 2024 6:14 PM September 22, 2024 6:14 PM

views 9

एनसीसीचे संयुक्त राज्य प्रतिनिधी आणि उपमहासंचालकांची उद्या नवी दिल्लीत बैठक

संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या अध्यक्षतेखाली एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेचे संयुक्त राज्य प्रतिनिधी आणि उपमहासंचालकांची बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. एनसीसी छात्रांची संख्या तीन लाखांनी वाढवून १७ लाखांपासून २० लाखांपर्यंत नेण्याच्या आराखड्याला नुकतीच मंजुरी मिळाली होती, त्यासह इतर विषयांवर या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय धोरणांमध्ये सुधारणा, आर्थिक गरजा, संबंधित घटकांमध्ये समन्वय वाढवणं, प्रशिक्षण आणि शिबिरांसाठी नव्या पायाभूत सुविधा उभारणं या विषयांवर यावेळी चर्चा होईल.