August 21, 2024 5:57 PM
27
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन पापोन यांचा राजीनामा
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन पापोन यांनी आज राजीनामा दिला. बांगलादेश क्रिकेट बोर्ड संचालकांच्या ढाका इथल्या तातडीच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. सध्याच्या मंडळाचा कार्यकाळ पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार होता. मात्र, बांगलादेशातल्या बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर नजमुल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. बांगलादेशाच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार फारुक अहमद यांची बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.