October 18, 2025 1:29 PM October 18, 2025 1:29 PM

views 31

देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणण्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही

देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणणार असल्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका खासगी वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेत बोलत होते. आपल्या सरकारनं सुरुवातीपासूनच दिशाभूल झालेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी पूर्ण संवेदनशीलतेनं काम केलं आहे. त्यामुळेच आज देशात नक्षलवादानं प्रभावीत जिल्ह्यांची संख्या केवळ ११ वर आली असून, केवळ मागच्या काही दिवसांतच ३०३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. आज संपूर्ण जग भारताकड...