October 15, 2025 8:11 PM

views 50

देशातल्या नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या घसरली

देशातल्या नक्षलवादाचा अतिप्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या ३ पर्यंत कमी झाली आहे. तर एकूण नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या १८ वरुन ११ पर्यंत घसरली आहे, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलं आहे.    सध्या छत्तीसगडमधल्या बिजापूर, छत्तीसगड आणि नारायणपूरमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आहेत. २०१३ मध्ये देशातल्या १२६ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता. यंदाच्या मार्चमध्ये ही संख्या १८ पर्यंत आणि आता ११ पर्यंत कमी झाली आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत देशाला नक्षलवादमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष...

April 17, 2025 1:56 PM

views 13

मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचा बीमोड होईल, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

पुढच्या वर्षी मार्चअखेरीपर्यंत देशातून नक्षलवादाचा बीमोड होईल, आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची त्यात महत्त्वाची भूमिका असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. मध्यप्रदेशात नीमच इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८६व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनने नक्षलविरोधी मोहिमांमधे महत्वाची कामगिरी बजावली आहे असं ते म्हणाले. विविध मोहिमांमधे सीआरपीएफचे २ हजार २६४ जवान शहीद झाल्याचं सांगून त्यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. विशेष कामगिरी बजावणाऱ...