October 17, 2025 12:38 PM October 17, 2025 12:38 PM
19
छत्तीसगडमध्ये २०८ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
छत्तीसगडमध्ये आज २०८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यामुळं जवळपास संपूर्ण अबूजमाड आता नक्षलवाद्यांच्या प्रभावातून मुक्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये ११० महिला आणि ९८ पुरुष आहे. त्यांनी १९ एके ४७ रायफली आणि १७ SLR रायफलींसह एकूण १५३ शस्त्र पोलिसांकडे जमा केली.