November 13, 2024 7:16 PM November 13, 2024 7:16 PM

views 11

अजित पवार यांच्याशिवाय कोणतंही सरकार राज्यात स्थापन होणार नाही – नवाब मलिक

विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर, अजित पवार यांच्याशिवाय कोणतंही सरकार राज्यात स्थापन होऊ शकणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.    भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेसनं राजकीय तडजोड केली आहे, मात्र शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे, असं ते म्हणाले.