October 4, 2025 9:09 AM

views 39

जीएसटी सवलतींमुळं नवरात्रीत मोठी उलाढाल

भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेत गेल्या दशकातील नवरात्रामधील सर्वाधिक उलाढाल यावेळी दिसून आली. सरकारनं केलेल्या नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणांमुळं ही उलाढाल झाली आहे. करांचे दर कमी झाल्यामुळं उत्पादनं खरेदी करणं अधिक सुलभ झालं आहे. या उपाययोजनांमुळं किंमती कमी होण्यासोबतच ग्राहकांच्या आकांक्षाही वाढल्या आहेत. कुटुंबांना नवीन वाहनांची खरेदी, घरगुती उपकरणांमध्ये गुंतवणूक आणि जीवनशैलीच्या वस्तूंवर अधिक मुक्तपणे खर्च करणं शक्य झालं आहे.   परिणामी उत्सवाचा आनंद विक्रमी वापरामध्ये रुपांतरित झाला आह...

September 21, 2025 9:04 AM

views 21

शारदीय नवरात्रोत्सवासाठी राज्यातली शक्तीपीठं सज्ज

नवरात्र महोत्सवासाठी राज्यातील शक्तीपीठांची मंदिरं सज्ज झाली आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभतेनं दर्शन घेता यावं यासाठीची सर्व व्यवस्था देवस्थान समिती आणि महापालिकेनं केली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल मंदिर परिसराला भेट देऊन उत्सवाच्या तयारीची पाहणी केली. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. इतर गावांमधून येणाऱ्या भाविकांसाठी वाहनतळ, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची...