November 8, 2025 7:09 PM

views 49

नवी मुंबईत सायबर फसवणुक करणाऱ्या १२ जणांच्या टोळीला अटक

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सायबर फसवणुक करणाऱ्या १२ जणांच्या टोळीला अटक केली आहे. ऑनलाईन गेमिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या या टोळीनं  आतापर्यंत सुमारे ८४ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचं  उघड  झालं आहे. यासाठी या टोळीनं देशभरातल्या विविध बँकांची तब्बल ८८६ खाती वापरली होती. पोलिसांच्या कारवाईत ५२ मोबाईल फोन, ७ लॅपटॉप, ९९ डेबिट कार्ड, ६४ पासबुकं आणि एक चारचाकी असा  १८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

July 12, 2025 7:43 PM

views 23

नवी मुंबई विमानतळाचं काम सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांनी या विमानतळाची पाहणी केली आणि आणि धावपट्टीपासून ते टर्मिनल इमारतीपर्यंतच्या प्रगतीची माहिती घेतली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. हा देशातला सगळ्यात अद्ययावत प्रकल्प ठरणार असून या विमानतळाचं ९४ टक्के काम पूर्ण झालं आहे. धावपट्टी आणि टर्मिनल इमारतीचं कामही पूर्ण झालं आहे. आता आतल्या भागाचं काम सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.  &nbs...

June 29, 2025 7:52 PM

views 13

इंडिया रेटींग अँड रिसर्च या अर्थविषयक संस्थेच्या वतीनं २०२४ – २०२५ या वर्षासाठी जाहीर केलेल्या पत मानांकनात नवी मुंबई महानगर पालिकेला डबल ए प्लस स्टेबल मानांकन जाहीर

इंडिया रेटींग अँड रिसर्च या अर्थविषयक संस्थेच्या वतीनं २०२४ - २०२५ या वर्षासाठी जाहीर केलेल्या पत मानांकनात नवी मुंबई महानगर पालिकेला डबल ए प्लस स्टेबल मानांकन जाहीर झालं आहे. नवी मुंबई महानगर पालिकेनं सलग अकराव्या वर्षी हे मानांकन मिळवलं असून, अशी कामगिरी करणारी ती देशातली एकमेव महानगरपालिका ठरली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा, महसूलविषयक जमा आणि खर्चाचा योग्य ताळमेळ, उत्तम कर वसुली, मालमत्ता कर विषयक दिलासादायक योजना अशा बाबींना प्राधान्य दिलेलं असल्यानं...

May 13, 2025 3:29 PM

views 134

नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचं काम उद्या होणार आहे. त्यासाठी उद्या  दुपारी १२ वाजल्यापासून ते १५ मे रोजी दुपारी १२पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.   त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांमध्ये या काळात  पाणी पुरवठा होणार नाही तसंच गुरुवारी १५ मे रोजी संध्याकाळी कमी दाबाने  पाणीपुरवठा होईल.  नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन ...

March 16, 2025 3:38 PM

views 24

नवी मुंबईत ३८ लाखांच्या अमली पदार्थाच्या मुद्देमालासह एकाला अटक

नशामुक्त अभियानांतर्गत नवी मुंबईतल्या गुन्हे शाखेनं आज केलेल्या कारवाईत दिघा इथल्या एका व्यक्तीकडून ३८ लाख ७९ हजार १३५  रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणात  गांजा, मेफेड्रोनसारखे अंमली पदार्थ, तसंच गावठी दारू, देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी याएका व्यक्तीला अटक करून त्याच्यावर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला येत्या १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली. या प्रकरणातल्या अन्...

February 7, 2025 3:39 PM

views 18

अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडून नवी मुंबईत २०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

NCB, अर्थात अमली पदार्थ विरोधी पथकानं गेल्या आठवड्यात नवी मुंबईत केलेल्या कारवाईत अंदाजे २०० कोटी रुपये किमतीचे विविध प्रतिबंधित पदार्थ जप्त केले. या कारवाईत NCB नं ४ जणांना अटक केली आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अमेरिकेतल्या एका टोळीनं मालवाहू सेवा, आणि मानवी तस्करांच्या माध्यमातून हे पदार्थ भारतात पाठवल्याचं NCB च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

January 20, 2025 7:21 PM

views 22

आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशी प्रणालीच्या चाचणीसाठी नवी मुंबईत प्रयोगशाळेचं भूमिपूजन

संरक्षण, अवकाश तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह उत्पादनं आणि वैद्यकीय उपकरणांच्या विकास आणि उत्पादन मानकांसाठीच्या केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेचं भूमिपूजन आज नवी मुंबईत झालं. समीर अर्थात सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या आवारात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी ही पायाभरणी केली. या प्रयोगशाळेसाठी 37 कोटी 21 लाख रुपये खर्च येणार आहे. ही प्रयोगशाळा हे सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाकडे एक पाऊल असल्याचं कृष्णन म्हणाले. कें...

January 8, 2025 7:07 PM

views 25

‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

देशाचं आणि समाजाचं नुकसान करत असलेल्या, न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी, समाजानं एकत्र येणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानं वाशी इथं आयोजित केलेल्या “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचं उद्घाटन करताना बोलत होते. अंमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचं दुष्कर्म करत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सजग राहा, सैनिक म्हणून पुढं या, हीदेखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजाची सेवा आहे, असं फडनवीस म्हणाले.    यावेळी वनमंत्री गणेश ...

October 31, 2024 2:59 PM

views 17

नवी मुंबईत गॅस सिलिंडरच्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू

नवी मुंबईतल्या उलवे इथं काल संध्याकाळी उशिरा तीन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका दुकान आणि घराला लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला. दुकानाचा मालक गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्याची पत्नी आणि दोन मुलांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

October 17, 2024 6:57 PM

views 17

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात झाली आहे.    रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास नाके उभारण्यात आले असून सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची १२० जवानांची तुकडी जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहे. तसंच सर्व मतदार केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करू...