April 15, 2025 8:02 PM April 15, 2025 8:02 PM

views 36

नागपुरात २४ एप्रिलपासून १००व्या नाट्य संमेलनाचं आयोजन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनाअंतर्गत नागपूर विभागाचं नाट्य संमेलन येत्‍या, २४ एप्रिल ते २७ तारखेदरम्यान नागपुरात कविवर्य सुरेश भट सभागृहात केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्‍यक्ष प्रशांत दामले यांनी नागपुरात  वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.    या संमेलनात व्यावसायिक नाटक, लोककलेवरचे कार्यक्रम, स्थानिक शाखा आणि कलावंतांचे सादरीकरण तसेच बाल कलावंतांची विशेष प्रस्तुती असणार आहे.