August 13, 2024 6:13 PM August 13, 2024 6:13 PM
12
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक १ हजार ९५० कामांना मंजुरी
नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपायोयजना करण्यासाठी २ हजार ७६६ कोटी रुपये खर्चाच्या एकूण १ हजार ९५० कामांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. दरड - वीज कोसळणे, पूर, यापासून संरक्षणासाठी भिंत, पुलांचं बांधकाम, नाला खोलीकरण, या कामांचा यात समावेश आहे. मंत्रालयातलं राज्य आपत्ती प्रतिसाद केंद्र अद्ययावत करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. राज्यातले सर्व जिल्हाधिकारी कक्ष या केंद्राशी जोडले जातील. तसंच प्रत...