September 6, 2025 10:18 AM September 6, 2025 10:18 AM

views 42

महाराष्ट्रातल्या सहा शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण हे व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  केलं. शिक्षक दिनाच्या निमित्ताने, नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी देशात शिक्षक दिन साजरा केला जातो.  या पुरस्कारविजेत्या शिक्षकांमध्ये महिलांची, तसंच ग्रामीण भागातल्या शिक्ष...