December 28, 2025 6:53 PM December 28, 2025 6:53 PM

views 16

पुण्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधे एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीची बोलणी फिसकटल्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधे आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शऱदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितलं. या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीलाही सामावून घेण्याची आपल्या पक्षाची तयारी असल्याचं काकडे यांनी सांगितल्याचं हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे.  आज पहाटेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ...

November 13, 2025 3:31 PM November 13, 2025 3:31 PM

views 123

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं निवडणूक चिन्ह बाद!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक चिन्हाशी साधर्म्य सांगणारं ट्रंपेट हे चिन्ह निवडणूक आयोगाने यादीतून बाद केलं आहे. या चिन्हाला मराठीत तुतारी असं नाव दिलेलं होतं. अनेक अपक्षांनी त्यावर निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यावर ट्रंपेट चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ होऊन आपली मतं अपक्षांना मिळाल्याचा दावा पक्षाने केला होता. आता निवडणूक आयोगाने हे चिन्ह यादीतून हटवलं आहे.