January 12, 2025 8:09 PM
19
तरुणांच्या क्षमतेमुळे भारत लवकरच विकसित होईल-प्रधानमंत्री
तरुणांच्या क्षमतेमुळे भारत लवकरच विकसित होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात युवा नेत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. भारतातले तरुण उल्लेखनीय` परिवर्तन घडवून आणत आहेत, आपला तरुण पिढीवर विश्वास असून तरुणांकडे प्रत्येक अडचणीचं उत्तर आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी काढले. महत्त्वाकांक्षी उद्दिष्टं साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक न...